महाराष्ट्र-शासन
ग्रामपंचायत विभाग
ग्रामपंचायत पारोळग्रामपंचायत विभाग
ग्रामपंचायत पारोळमाझ्या प्रिय ग्रामस्थांनो,
आपली ग्रामपंचायत पारोळ ही पेसा ग्रामपंचायत असून, येथे अधिक लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. मी स्वतःही आदिवासी समाजाचा घटक असून, या भूमीशी माझं नातं रक्तात आहे. मात्र, माझं नेतृत्व हे फक्त एका समाजापुरतं मर्यादित नाही — माझं ध्येय आहे सर्व समाजघटकांचा समतोल आणि सर्वांगीण विकास.
माझं कार्य हे सर्व ग्रामस्थांसाठी आहे. मग ते कोणत्याही समाजाचे, जातीचे, धर्माचे असोत. प्रत्येक व्यक्तीला सन्मान, संधी आणि सुविधा मिळावी, हेच माझं ध्येय आहे.
पेसा कायद्याने आपल्याला स्वशासनाचे अधिकार दिले आहेत. हे अधिकार केवळ कागदावर न राहता, गावाच्या निर्णय प्रक्रियेत लोकांचा सक्रिय सहभाग वाढवणे हे माझं प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामसभा हीच सर्वोच्च संस्था आहे, आणि तिच्या माध्यमातून आपण गावाचा विकास निश्चित करू शकतो.
गावाचा विकास हा सर्वांचा सहभाग, सर्वांचा विश्वास, आणि सर्वांचा लाभ यावर आधारित असावा हीच माझी भूमिका आणि वचन आहे.
ग्रामपंचायत पारोळ द्रुष्टीकोन म्हणजे एक स्वयंपूर्ण, सशक्त आणि सर्वसमावेशक ग्रामसमाज घडवणे जिथे प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण, आरोग्यसेवा, सुरक्षित पर्यावरण आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील.
आम्ही पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग, नवतंत्रज्ञानाचा वापर आणि सामाजिक समरसतेच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करतो.
दोन गावांचा समन्वय राखत, ग्रामपंचायत ही एक विश्वासार्ह, उत्तरदायी आणि प्रगतिशील संस्था म्हणून कार्यरत राहील.
गावकऱ्यांच्या सहभागातून, नवकल्पना आणि शाश्वत विकासाच्या तत्त्वांवर आधारित, आम्ही आमच्या गावांना एक आदर्श ग्रामविकास मॉडेल बनवण्याचा संकल्प केला आहे.
सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामविकास
पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन
डिजिटल युगाशी सुसंगत सेवा
नागरिकांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी